Home महाराष्ट्र मोठी बातमी! गजानन कीर्तिकर यांच्या हकालपट्टीच्या मागणीला भाजपचा पाठिंबा!

मोठी बातमी! गजानन कीर्तिकर यांच्या हकालपट्टीच्या मागणीला भाजपचा पाठिंबा!

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गजानन कीर्तिकर आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्ष विरोधी वक्तव्य करुन ठाकरे गटाची बाजू घेतली. मतदानादिवशी गजानन कीर्तिकरांच्या पत्नीनं मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. गजानन कीर्तिकरांचा खासदार निधी अमोल यांनी प्रचारासाठी आणि विकास कामांसाठी वापरला. अमोल हे गजानन कीर्तिकर यांच्या कार्यालयातून कारभार करत होते. यामुळे ठाकरे गटाला फायदा झाला. गजानन कीर्तिकरांचे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. गजानन कीर्तिकरांना ‘मातोश्री’वर लोटांगण घालण्याची घाई झाली आहे. ‘मातोश्री’चे ‘लाचार श्री’ होणाऱ्यांना पक्षातून त्वरित बाहेरचा रस्ता दाखवा. गजानन कीर्तिकरांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्या”, असं शिशिर शिंदे पत्रात म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

शिशिर शिंदे यांनी केलेल्या मागणीला भाजपने पाठिंबा दिला आहे. गजानन कीर्तीकरांना अस्तनीतले निखारे म्हणत मुलाला खासदार करण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप, भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केलाय. एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी घेवून अर्ज मागे घेण्याचा गजानन कीर्तिकरांचा कट होता. मुलगा अमोल कीर्तिकरांना बिनविरोध करण्याचा डाव होता, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या –

“…अन् राज ठाकरे माध्यमांवर भडकले; नेमकं कारण काय, वाचा सविस्तर”

“प्रफुल्ल पटेल 2004 पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते”

2004 मध्ये छगन भुजबळ यांना मुख्यमंत्रीपद केलं असतं तर…; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट