नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी `यांच्या उपस्थितीत नागपुरातील कडबी चौक ते गोळीबार चौक उड्डाणपुलाचं भूमीपूजन आज पार पडलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या समारंभाला व्हिडीओ लिंकद्वारे उपस्थिती लावली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींचं कौतुक केलं. मुख्यमंत्री म्हणाले की, आज मला युतीच्या सरकारमध्ये झालेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेची आठवण येते.
आज मला युतीच्या सरकारमध्ये झालेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेची आठवण येते. नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यावेळी त्यांच्या कारकिर्दीत हा हायवे उभारण्यात आला. नितीन गडकरींच्या कामाचा अभिमान वाटतो. आता आपण समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा लवकर सुरु करतोय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
गडकरीसाहेब राज्याला आपल्या मदतीची गरज आहे. भविष्यात पर्यावरणाचे हित सांभाळात काम करायचे आहे. कितीही पाऊस पडला तरीही बाधा येणार नाही, असे काम भविष्यात करायचे आहे. सहकार्याचा रस्ता नॅरोगेज न राहता ब्रॅाडगेज असावा, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, कडबी चौक ते गोळीबार चौक 4.82 किमीचा नवीन उड्डाण पूल बनवण्यात येणार असून यासाठी 146 कोटी रुपये खर्च होणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“रिकामटेकडे दौरा करतात की टीका करतात, हे महाराष्ट्राची जनता पाहतेय”
विरोधी पक्ष मोकळा आहे, डोकं रिकाम असतं, आरोप करतच असतात; संजय राऊतांचा टोला
कुठेही जा, तुमची ओळखही शिवसैनिक म्हणूनच; शिवसेनेचा नारायण राणेंना टोला