नवी दिल्ली : 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देईल. राज्य सरकारला एक पैसाही खर्च करण्याची गरज राहणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.
गेल्या 100 वर्षात अशी महामारी आली नव्हती. देशाने या संकटाचा अनेक आघाड्यांवर सामना केला आहे. गेल्या दीड वर्षात आपण हेल्थ केअर स्ट्रक्चर वाढवण्यात आले आहे. मेडिकल ऑक्सिजनची या देशात कधीच एवढी कमतरता जाणवली नव्हती. त्यासाठी सैन्य दलाच्या तिन्ही तुकड्यांना कामाला लावण्यात आल्या. जगातील कानाकोपऱ्यातून जे काही आणणं शक्य होईल ते आपण आणून या संकटाचा सामना केला, असंही मोदी यावेळी म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जनतेशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
नाथाभाऊंनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं- चंद्रकांत पाटील
…तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा- निलेश राणे
सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ, सरकार स्थापन करायला तळमळताहेत- एकनाथ खडसे
नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं चंपा म्हणतात- अमोल मिटकरी