बाबरीपासून ते मराठी अभिमानासाठी लढण्यापर्यंत अनेक खटले अंगावर घेतलं; संजय राऊतांचं कंगणाला प्रत्युत्तर

0
161

मुंबई : मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगणा रणाैतचं मुंबईतील ऑफिसवर कारवाई केली होती. यावर कंगनाने मुंबई महापालिकेकडून आपल्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. आज झालेल्या सुनावणीत कंगनाकडून कारवाईचा आदेश देणारा अधिकारी आणि संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची मागणी करण्यात आली. यावर शिवसेना खासदार यांनी संजय राऊत प्रतिक्रिया देत कंगणाला प्रत्युत्तर दिलं आहे.

अभिनेत्रीने उच्च न्यायालयात महापालिकेविरोधात बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यात आल्याने खटला दाखल केला असून मला प्रतिवादी बनवण्याची मागणी केली आहे. बाबरी केस ते मराठी अभिमानासाठी उभं राहण्यापर्यंत अनेक खटले मी अंगावर घेतले आहेत. ही गोष्ट मला माझं शहर आणि महाराष्ट्राच्या अभिमानासाठी लढण्यापासून रोखू शकत नाही., असं संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“…तर आज शरद पवारांना उपवास घोषित करावा लागला नसता”

99 टक्के शिवसैनिकांना संजय राऊत खटकतात- निलेश राणे

मराठा आरक्षणावरून शरद पवारांनी सोडलं माैन; म्हणाले…

धनगर आरक्षणासाठी शुक्रवारी राज्यभरात आंदोलन; पंढरपुरात ढोल वाजवणार- गोपीचंद पडळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here