आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : अभिनेत्री कंगना रनौत हिने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले, असं वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तिच्या या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वच स्तरांतून निषेध केला जात आहे. यावरून आता अभिनेते विक्रम गोखले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; नवी मुंबईतील अनेक तरूणांनी मनसेचा झेंडा हाती धरला”
‘कंगना म्हणाली ते खरं आहे. मी तिच्या वक्तव्याचं समर्थन करतो, कुणाच्या मदतीने नाही तर देशाला स्वातंत्र्य हे भिकेनेच मिळालं आहे, स्वातंत्र्यविर फाशीवर जात असताना त्यांना कुणीही रोखलं नाही’ , असं म्हणत विक्रम गोखले यांनी कंगणाच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.
दरम्यान, विक्रम गोखले हे पुण्यातील एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळं राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“1993च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता”
“…तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा, मोदी-शहांना जाब विचारावा”
…तरी भाजपला कोणीच पराभूत करू शकत नाहीत; अमित शहांंचं मोठं वक्तव्य