पुणे : “आरोग्यम् धनसंपदा, निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे. वात, पित्त आणि उष्णतेच्या तक्रारींवर प्रभावी कांस्य धातू थाळी मसाज सेवा पूर्णपणे मोफत असून, वडारवाडी येथील डॅा.होमी भाभा रूग्णालयाच्या जवळ ही सेवा मागील आठ दिवसांपासून देण्यात येत आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन शिवाजीनगर गावठाण येथे देखील ही सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे,” अशी माहिती आयोजक, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस रविंद्र साळेगांवकर यांनी दिली.
शिवाजीनगर, मॅाडेल कॅालनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या सेवेचा लाभ घेत आहेत. पन्नास वर्षाच्या पुढील महिला व पुरूषांसाठी मसाज सेवा मोफत आहे. मसाज घेण्यासाठी येताना नागरिकांनी आधार कार्ड घेऊन येणे गरजेचे आहे. सकाळी १० ते सायं ७ वाजेपर्यंत मसाज सेवा सुरू असून फक्त सोमवारी बंद असेल, अशी माहिती आयोजक साळेगावकर यांच्या वतीने देण्यात आली.
मोफत कांस्य धातू थाळी मसाज सेवेचे उदघाटन मॅाडेल कॅालनी परिसर सुधारणा समितीचे अध्यक्ष विक्रम मोहिते, अॅड. मिलिंद महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुनिल पांडे, हरिष अनगोळकर, मंदार देवभाणकर, राजू शहा, बॉबी अनगोळकर,कनक महाजन, राजेश नायडू, प्रशांत लाटे, ईश्वर बनपट्टे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मसाजचे फायदे
- पायावरची सूज कमी करण्यासाठी
- तळव्यावला भेगा पडणे, पायाची जळजळ कमी करणे
- रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी
- निद्रनाशाची समस्या आटोक्यत राहण्यासाठी
- डोळ्याखाली असलेला काळेपणा कमी करण्यासाठी

