Home महाराष्ट्र शिधापत्रिका नसली तरी मोफत धान्य दिलं जावं; देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारला विनंती

शिधापत्रिका नसली तरी मोफत धान्य दिलं जावं; देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारला विनंती

पुणे : शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्यांचे धान्य मोफत देण्याचे स्पष्ट आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्याची त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी. शिधापत्रिका नसली तरी मोफत धान्य दिलं जावं, अशी विंनती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

राज्य सरकारने 3 महिन्यांचे धान्य मोफत देण्याचा पहिला आदेश आणि नंतर 31 मार्च रोजी काढलेल्या जिआरमध्ये त्या-त्या महिन्याचे धान्य देण्याचा आदेश काढला. यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे ते दूर व्हायला हवे, असं फडणवीस म्हणाले.

शिधापत्रिकाधारकाने शिधापत्रिकेचा वापर केला नसेल तरी ते रद्द करण्यात येऊ नये, त्यावरही धान्य देण्यात यावे. शिवाय ज्यांच्याकडे शिधापत्रिका नसेल त्यांनाही आधारकार्डाच्या आधारे किंवा साक्षांकीत प्रती करुन तात्पुरते कार्ड पुरवावे आणि त्यावर धान्य देण्यात यावे. राज्यात धान्याअभावी कोणीही उपाशी राहू नये, अशी कळकळीची विनंती आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची खैर केली जाणार नाही”

मरकजमधील व्यक्तींनी पुढे येऊन तपासणीसाठी सहकार्य करावं- उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या 335 वर; मुंबईत 14 रुग्ण तर बुलढाण्यात 1 रुग्ण

संजय राऊत म्हणजे पवारांच्या घरचे खरूजलेले कुत्रे; भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य