मुंबई : काही दिवसांपूर्वी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिलं. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असं म्हणत संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली होती. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मराठा आरक्षण प्रश्नावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारवेळा भेटण्याची वेळ मागितली. परंतु आजपर्यंत मोदींनी त्यांना वेळच दिली नाही. चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा, कंगना राणावत व इतर बॉलिवूड अभिनेत्यांना भेट देतात. या सर्व तारकांचे कोणते गहन प्रश्न होते त्यांना मोदींनी वेळ दिला आणि मराठा आरक्षणाकरिता भेट मागणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही. संभाजीराजेंना भेट न देणे हा महाराष्ट्राचा अवमान आहे, असं सचिन सावंत म्हणाले आहेत
मोदींनी कोणाला भेटावे हा त्यांचा प्रश्न असल्याने आमचा आक्षेप नाही पण मराठा समाजाच्या समस्या घेऊन जाणाऱ्या आपल्याच पक्षाच्या नेत्यांना व तेही छत्रपतींच्या वंशजाला भेट न देणे हे महाराष्ट्राला कदापि आवडणार नाही, असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“इम्तियाज जलील ब्लॅकमेलिंगचं काम करतो, तो दुकाने उघडायला आला तर त्याला शिवसैनिक उत्तर देतील”
राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर आम्ही पेढे वाटू- संजय राऊत
“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांचं दु:खद निधन”
मुख्यमंत्री जे फेसबुक वरून देतात ते ज्ञान, अज्ञान की वाफा असा प्रश्न आमच्याही मनात- अतुल भातखळकर