आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि पाली यांच्याकडे असणाऱ्या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे. लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण 25 किलो मीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 3050 फूट उंच आहे.
किल्ल्याचा इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये लोहगड, विसापूरसह कोरीगडही स्वराज्यात सामील करून घेतला.
कर्नल प्राथर या ब्रिटिश अधिकाऱ्यानं 11 मार्च 1818 ला कोरीगडावर चढाई केली. मात्र मराठ्यांनी त्याला चिवट झुंज दिली त्याला यश येत नव्हते. तीन दिवस शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेल्या दारुकोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली. त्यामुळे किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.
किल्ल्यावरील पहाण्यासारखी ठिकाणे
लोणावळ्याच्या दक्षिणेला सहज जाता येण्यासारखा हा किल्ला घाटमाथ्यावर असल्यामुळे एकाच वेळी कोकण व देशावरील परिसराचे विस्तृत दर्शन घडते. तीन हजार फूट उंचीच्या किल्ल्यावर कोराईदेवीचे मंदिर व मोठे तळे पहाण्यासारखे आहे. बुरुजावरुन कोकणातील मुलुखाचे विहंगम दृश्य दिसते. मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे त्याचे नाव आहे कोरबारस मावळ. याच मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात. हा किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या सद्यःस्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे .तसच गडावरील एकूण सहा तोफ़ांपैकी सगळ्यात मोठी तोफ ’लक्ष्मी’ मंदिराजवळ आहे. गणेश टाकेगडावर दोन मोठी तळी आहेत. गडाच्या पश्चिम कड्याच्या उत्तर भागात काही छोट्या गुहा आहेत. ह्यालाच गणेश टाके म्हणतात. हे गडावरील पाहण्यासारखी ठिकाने आहेत.
गडावर कसे जाल?/ गडावर जाण्याच्या वाटा
गडावर जायचे दोन मार्ग आहेत. उगवतीकडची राजवाट सोपी आहे तर आंबवण्याकडची वाट अवघड आहे. पूर्वेच्या वाटेने जायला घळीतून जावे लागते. अर्ध्या वाटेवर एक दुघई गुहा व श्री गणेशाची मूर्ती आहे. थोडे वर चढाई केल्यास प्रवेश द्वाराला नवीन लाकडी दरवाजा लावला आहे.
लोण्यावळ्यापासून 25 कि. मी. वर शहापूरला खाजगी वाहनाने जाता येते.
महत्वाच्या घडामोडी –
“वाघनखं गमावलेल्या पक्षाचा ‘राज्य सरकार पुरस्कृत’ महाराष्ट्र बंद अयशस्वी”
भाजपला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वीच ‘या’ मोठ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
“महाविकास आघाडी सरकारचा पोपट झाला, तिन्ही पक्ष्यांनी उरली सुरली इज्जत मातीत मिळवली”
“संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी”