Home महाराष्ट्र माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केली राजकीय निवृत्ती

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केली राजकीय निवृत्ती

मुंबई : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करून हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे.  हर्षवर्धन जाधव यांनी पत्नीच्या हाती राजकीय सूत्र सोपवत असल्याचं व्हिडीओत सांगितलं आहे.

लॉकडाउन सुरु असल्याने सर्वजण वाचनाचा छंद जोपासत आहेत. मी देखील माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. यामधून आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्याची जाणीव मला झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी माझी पत्नी संजना जाधव असेल. आपल्याला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्यावेत अशी विनंती मी करत, असं हार्षवर्धन जाधव म्हणाले आहेत.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी अचानक संन्यास घेत असल्याची घोषणा केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही; रोहित पवारांच उत्तर

लॉकडाउन सुरू झाल्यापासून राज्यात सायबर गुन्हे वाढले- अनिल देशमुख

गरजू नागरिकांसाठी छगन भुजबळांनी केंद्राकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी

ट्रेंडिंग घडामोडी –