अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अण्णासाहेब फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.
मराठा आरक्षण प्रकरणी सरकार कमी पडतंय. आमचं खरं नुकसान मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे प्रमुख अशोकराव चव्हाण यांनी योग्य पद्धतीने काम न केल्यामुळे झालं आहे, अशी टीका नरेंद्र पाटील यांनी केली आहे. ते अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री असून ते किती ताठर आहेत हे आम्हाला माहिती आहे. त्यांनी कुठल्याही मराठा क्रांती मोर्चा लोकांसोबत समन्वय साधला नाही. अशोक चव्हाण यांना खासदार छत्रपती संभाजी महाराज आणि विनायक मेटे यांच्यासह इतर समन्वयक वेळोवेळी भेटून सांगत होते. पण तरी गडी ऐकायलाच तयार नाही, असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी अशोक चव्हाणांवर हल्लाबोल केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
महिला दिनानिमित्त अमृता फडणवीसांचा नवा व्हिडीओ; पहा व्हिडिओ
…ही तर सर्व बेबी पेंग्विनची नाईटलाईफ गँग; नितेश राणेंची टीका
रिक्षावाल्याच्या लावणीवर तुम्हीही व्हाल फिदा; व्हिडिओ होतोय व्हायरल
“राज्यात भाजपची सत्ता कधीही येऊ शकते”