“आमच्यासाठी ‘तो’ विषय संपला, आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आला तर सोडत नाही”

0
362

मुंबई : वेळ आली तर शिवसेना भवन देखील फोडू, असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं होतं. यावरुन शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. आता यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तोडफोड करणं भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. प्रसाद लाड यांनी आपला व्हिडीओ काढून स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्य़ासाठी हा विषय संपलेला आहे. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही; पण अंगावर आलं तर सोडत नाही, असा इशाराही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिला.

दरम्यान, मुंबईमध्ये भाजप कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

ऑलिम्पिकमध्ये भारताच्या झोळीत तिसरं पदक; पी. व्ही. सिंधूनं जिंकलं कांस्यपदक

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दाैऱ्यावर, पूरग्रस्त भागांची पाहणी करणार”

“बरोबर बोललात राऊत साहेब, महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे, पण…”

नागपुरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here