उद्धव ठाकरेंसाठी राणे हा संपलेला विषय असल्यामुळे…; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका

0
194

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात भाजप नेते नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांवर जोरदार हल्ला चढवला होता त्याला नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं होतं. आता शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला आहे.

गेल्या 15 वर्षात राणेंनी उद्धव ठाकरेंवर अनेकदा टिका केली पण उद्धव ठाकरेंसाठी राणे हा संपलेला विषय असल्यामुळे त्यांनी या 15 वर्षात कधीही राणेंचे नाव घेऊन टीका केली नाही, असं म्हणत वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंमुळे राणेंना गेल्या 15 वर्षात स्वतःच्या पक्षासह अनेक पक्ष विसर्जित करावे लागले. पक्ष सोडावे लागले त्यामुळे राणेंचा उद्धव ठाकरेंवर राग असणे स्वाभाविक आहे”, असं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दरवर्षीच्या दसरा मेळाव्याला शिवसेनापक्षप्रमुख महाराष्ट्राला मार्गदर्शन करतात. उद्धव ठाकरे केंद्र सरकारबद्दल बोलले. मराठा, धनगर आरक्षणाबद्दल बोलले होते. दसरा मेळाव्यातील भाषणात ही उद्धव ठाकरेंनी राणेंचे नाव घेतलं नाही. परंतु, त्यांनी दिलेलं एक उदाहरण राणेंना चपखल बसल्यामुळे त्यांचा संताप झाला, असंही नाईक म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

भाजप सोडून कुणीही जाणार नाही- गिरीश महाजन

हे दसऱ्याचं भाषण होतं की शिमग्याचं?; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा फ्लॉप शो- आशिष शेलार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here