“महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, सर्व ठाकरेंनी, आता तरी एकत्र यायला हवं”

0
471

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली आहे. त्यामुळे आता सर्व ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे, अशा चर्चांनी जोर धरला आहे. यावर आता हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू व जयदेव ठाकरे यांचे पुत्र जयदीप ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.

शिंदे यांच्या बंडखोरीमुळं शिवसेना मोठ्या संकटात सापडली आहे, अशा परिस्थितीत सर्व ठाकरेंना एकत्र यायला पाहिजे, असं तुम्हांला वाटतं का?, असा सवाल जयदीप ठाकरेंना यावेळी केला. यावर जयदीप ठाकरेंनी, महाराष्ट्राच्या भविष्यासाठी सर्व ठाकरेंनी ‘एकत्र आलंच पाहिजे’, असं उत्तर यावेळी दिलं. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हे ही वाचा : महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होईल; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य

दरम्यान, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव जरी मिळाले असले तरी ते रक्त आमच्याकडे आहे, असंही जयदीप ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

बंडाविषयी बोलताना आदित्य ठाकरेंचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले, 20 मे रोजी, ठाकरेंनी शिंदेंना बोलावलं आणि…

शिवसेना-काँग्रेस तपास यंत्रणांना कमजोर करण्याचं काम करत आहेत; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शिंदे गटाला मिळाली ‘ढाल-तलवार’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here