आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवा; ‘या’ नेत्याचं कार्यकर्त्यांना आवाहन

0
363

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भुसावळ : जिल्हा काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष प्रदीप पवार यांचा शोधरानगरमध्ये भुसावळ तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचाच झेंडा फडकवा, असं आवाहन प्रदीप पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी सज्ज होऊन तयारीला लागावे. सोबतच महाविकास आघाडी सरकारने केलेली विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावी व सरकारप्रती आत्मीयता निर्माण करावी. त्याचबरोबर निवडणुकांमध्ये काँग्रेसचाच झेंडा फडकवा, असं प्रदीप पवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा : “ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; ओबीसी आरक्षणासाठी उचललं ‘हे’ मोठं पाऊल”

दरम्यान, यावेळी प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सचिव राहुल मोरे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, भुसावळ तालुकाध्यक्ष पंकज पाटील, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र श्रीनाथ, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुनव्वर खान यांच्यासह वॉर्डातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.

महत्वाच्या घडामोडी –

रामदास आठवलेंनी सांगितला रिपाई-भाजप युतीचा फाॅर्म्युला, म्हणाले…

निवडणुका सगळ्याच एकत्र घ्या किंवा… ; अजित पवारांचं रोखठोक मत

निवडणुकीआधी काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here