सांगली : गेल्या काही दिवसांपासून सांगली, सातारा, कोल्हापूरला पावसाने चांगलंच झोडपलं आहे. तसेच या 3 जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यावर काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सांगली जिल्ह्याला पुराचा फटका बसलेला आहे मात्र 2019 ला जी परिस्थिती निर्माण झाली होती तशी काही भागात दिसत नाहीये हे चांगलं आहे. प्रशासनाने आधीपासून खबरदारी घेऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं होतं, असं म्हणत विश्वजित कदम यांनी प्रशासनाचं काैतुक केलं आहे.
प्रशासनाने अगोदरच तयारी केली होती. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. त्यांची जेवणाची आणि इतर गोष्टीची सोय करण्याचही काम सुरू आहे, असंही विश्वजित कदम यांनी म्हटलं. तसेच सांगली कोल्हापूरची पूरस्थिती आटोक्यात येतीय. आता धोका कमी होतोय. परिस्थिती आटोक्यात येतीय. कोकणवासियांना मोठा फटका बसला. कोकणी बांधवांना आधार देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत., असंही विश्वजित कदम यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
सरकारतर्फे संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल; महाड दाैऱ्यात मुख्यमंत्र्यांचं गावकऱ्यांना आश्वासन
जनता पुरात, पालकमंत्री मुंबईत, हे पालकमंत्री नव्हे, हे पळपुटे मंत्री; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
सांगलीकराना मिळणार दिलासा; कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होण्याची शक्यता
महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचंही लक्ष- देवेंद्र फडणवीस