मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. राज ठाकरेंना 5 जानेवारील कोर्टात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आता ॲमेझाॅन आणि मनसे वाद चांगलाच चिघळला आहे. यावर मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात चित्रे यांनी ट्विट केलं आहे.
फिल्पकार्ट ने मराठी केलं आता ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार..दिलेला शब्द पाळ्याबद्दल फिल्पकार्टचे आभार., असं ट्विट करत चित्रे यांनी ॲमेझाॅनला इशारा दिला आहे.
दरम्यान, अॅमेझॉनला महाराष्ट्रात व्यवसाय करु देत आहे हे विसरता कामा नये. अॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार हे नक्की आहे, असंही चित्रे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.
फिल्पकार्ट ने मराठी केलं आता @amazonIN ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार..दिलेला शब्द पाळ्याबद्दल @Flipkart @flipkartsupport चे आभार @mnsadhikrut pic.twitter.com/VUTd9aEC4t
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) December 24, 2020
महत्वाच्या घडामोडी-
जाणते नव्हे तुम्ही तर विश्वासघातकी राजे; सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर बोचरी टीका
राजू शेट्टींची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी; आशिष शेलारांचा टोला
“मोठी बातमी! प्रियांका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात”
EWS च्या लाभ देण्याने मराठा आरक्षणास धक्का लागल्यास राज्य सरकार जबाबदार- संभाजीराजे