Home महाराष्ट्र औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाखांची मदत; उद्धव ठाकरेंची...

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाखांची मदत; उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई : औरंगाबादमध्ये 16 मजूरांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख मुख्यमंत्री सहायता निधीतून देणार असल्याची घोषणा केली आहे.

मजुरांच्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत.

दरम्यान, जालना येथे काम करणारे मजूर भुसावळकडे चालत प्रवास करत असताना थकून रुळावर झोपल्याने त्यांच्या अंगावरून मालगाडी गेल्याने 16जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

औरंगाबादमध्ये 16 मजूरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू

करोनाच्या मृतांचं राजकारण नको, राजेश टोपे यांच विरोधकांना प्रत्युत्तर

…त्यामुळे राज्यातील तरुणांनाही रोजगार मिळेल; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

राज्याच्या इतिहासात प्रथमच असा विरोधी पक्ष आहे, जो महाराष्ट्राची बाजूच घेत नाही- संजय राऊत