Home महाराष्ट्र ‘पहले मंदिर, फिर सरकार’ आता मात्र पहिले सरकार फिर मंदिर; रावसाहेब दानवेंचा...

‘पहले मंदिर, फिर सरकार’ आता मात्र पहिले सरकार फिर मंदिर; रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : राम मंदिराच्या कामाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 5 ऑगस्ट रोजी होणार आहे.. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजेरी लावण्याची शक्यता आहे. यावरुन भाजप नेते आणि केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राममंदिराच्या पायाभरणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण आले किंवा नाही आले, तरी पायाभरणीला त्यांनी जावे. शिवसेनेचा नारा होता की ‘पहले मंदिर, फिर सरकार’ आता मात्र पहिले सरकार फिर मंदिर असं झालं आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अमर, अकबर अँथनीचं सरकार आहे. ते पायात पाय घालून आपोआपच पडेल, असं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आता तरी जागे व्हा, मोठ्या प्रमाणात चाचण्यांना पर्याय नाहीच; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा

करोना चाचण्या कमी केल्यानं आपण काय कमावलं काय गमावलं? फडणवीसांनी दिलं उत्तर

महाविकास आघाडी म्हणजे अमर अकबर अँथनी, ते पायात पाय घालून आपोआप पडतील- रावसाहेब दानवे

“अमृतासारखं दूध ओतून देतानाचा त्रास लक्षात घ्या”