Home देश आधी आरक्षण आणि मगच भरती; मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक

आधी आरक्षण आणि मगच भरती; मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार छत्रपती संभाजीराजे खूपच आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय निकाली लागल्याशिवाय कोणतीही भरती करु नका, असं संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्ट करत ही महत्वाची मागणी केली आहे.

आधी आरक्षण आणि मगच भरती! हीच मराठा समाजाची भूमिका आहे. मराठा समाजाच्या 13 टक्के जागा सोडून पोलीस भरती काढू, असं बोलणं म्हणजे समाजाच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा प्रकार आहे. म्हणजे सरकारला आरक्षणाचा मुद्दा निकाली काढायचा नाहीये का? अशी शंका लोकांना येत आहे., असं संभाजीराजेंनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, यापुढे कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती काढली जाऊ नये, मग ती पोलीस भरती असो की एम पी एस सी ची किंवा आणखी कुठलीही परीक्षा असो मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय निकाली लागल्याशिवाय भरती नको, अशी पोस्ट संभाजीराजेंनी फेसबुकवर टाकली आहे.

https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/posts/1676801785811367

महत्वाच्या घडामोडी-

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी”

मुंबईत जुन्या पासपोर्ट ऑफिसमध्ये स्फोट; आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश

“काॅंग्रेस नेते आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण”

बाळासाहेबांनीच पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला, महाराष्ट्र जात-धर्म मानत नाही; संजय राऊतांचे फडणवीसांना उत्तर