तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्याला आग, अग्निशमन दलाच्या जवानाचा गुदमरुन मृत्यू

0
253

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहती मधील कारखान्याला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या एका जवानाचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर आणखी काही जवानांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याची माहिती कळत आहे. बाळू देशमुख असं मृत जवानाचे नाव आहे

औद्योगिक क्षेत्रात भूखंड क्रमांक जे-39 वर असलेल्या मोदी केमिकल या रसायनांवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याला शुक्रवार (5 डिसेंबर) रात्री 12 च्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे पहाटे 5 वाजताच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं आहे.

दरम्यान, या आगीत अग्निशमन दलाच्या एका जवानाचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला अग्निशमन दलाचा जवान हा अंबरनाथ अग्निशमन दलाच्या पथकात कार्यरत असल्याची माहिती आहे. तर जखमी जवानांना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“संजय राऊत यांना लिलावती रूग्णालयातून डिस्चार्ज”

“भाजपच्या नेत्यांनी यापुढे झेपेल तितकंच बोलावं”

मित्रपक्षांनीच शिवसेनेच्या मृत्यूचा सापळा रचलाय; विधानपरिषद निकालांवरुन नितेश राणेंची टीका

बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितचा हॅरी पाॅर्टर लूक; सोशल मिडीयात धुमाकूळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here