नवी दिल्ली : दिल्लीतील अनाज मंडी येथे 3 कारखान्यांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत आत्तापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
अग्निशामक दलाच्या मदतीने जवळपास 59 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.
आग लागण्यामागील नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. अग्निशामक दलाच्या 30 गाड्या घटनास्थळावर आग विझवण्याचं काम करत आहेत. संबंधित कारखान्यांमध्ये कागदाचे बॉक्स बनवण्याचं काम होत होतं.
दरम्यान, जखमींना उपचारासाठी दिल्लीतील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आगीच्या धुरामुळे श्वास गुदमरल्याने अनेक मजूरांची स्थिती नाजूक आहे.
Death toll rises to 43 in #Delhi fire incident, according to police. pic.twitter.com/FAYd3LNoOB
— ANI (@ANI) December 8, 2019
महत्वाच्या घडामोडी –
बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश- सुप्रिया सुळे
शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
हिंदू समाज जागृत झाला तर गाईंची कत्तल थांबेल- मोहन भागवत
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीचं कर्करोगामुळे निधन