बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात FIR दाखल

0
158

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. याप्रकरणी पायल घोषने पोलिसांत तक्रार दाखल केली असून अनुराग कश्यपला अटक करण्याची मागणी केली आहे.

पायल घोष ही नितिन सातपुते या तिच्या वकिलासह अनुराग कश्यपविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी वर्सोवा पोलीस ठाण्यात पोहचली होती. त्यानुसार अनुराग कश्यप याच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बलात्कार, गैरवर्तन आणि अशोभनिय कृत्य केल्याप्रकरणी कलम  376, 354, 341, 342 अन्वये लेखी तक्रार दाखल करण्यात आलं असून पायलचं बयान दाखल करण्यात आलं आहे, असं पायलचे वकील नितिन सातपुते यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी-

“शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण”

राजस्थान राॅयल्सची विजयी सलामी; चेन्नई सुपर किंग्सचा 16 धावांनी पराभव

बाबरीपासून ते मराठी अभिमानासाठी लढण्यापर्यंत अनेक खटले अंगावर घेतलं; संजय राऊतांचं कंगणाला प्रत्युत्तर

“…तर आज शरद पवारांना उपवास घोषित करावा लागला नसता”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here