“महाराष्ट्रात खंजीर खुपसणारे म्हणून कोण ओळखले जातात? याचा आधी शोध घ्या”

0
175

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काल चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजप आमदार राम कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रात खंजीर खुपसण्यासाठी कोण ओळखले जातात याचा आधी शोध घ्या, अशा शब्दात त्यांनी रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदरणीय चंद्रकांत पाटील यांच्या निष्ठांबाबत रोहित पवारांनी न बोललेलंच बरं. महाराष्ट्रात खंजीर खुपसणारे म्हणून कोण ओळखले जातात? याचा आधी शोध घ्यावा. त्यांनी मुळात निष्ठेविषयी बोलूच नये, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवाय जे स्वतः पुण्यातून विधान परिषद मागायला भाजपा नेत्यांच्या पायऱ्या झिजवत होते त्यांनी चंद्रकांत पाटलांवर आक्षेप घ्यावा? आता तरी खरच राजकारण थांबवा. जनतेला अजून पाच पैश्याची सुद्धा मदत केली नाहीं त्यावर बोला, असा सवालही राम कदम यांनी रोहित पवार यांना केला.

महत्वाच्या घडामोडी-

सुशांतच्या केसवरून निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर आरोप; म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर; स्वतः गाडी चालवत ‘मातोश्री’हून रवाना

नरेंद्र मोदींनी संस्कृत श्लोक ट्विट करत केलं राफेलचं स्वागत

मुख्यमंत्र्यांचा दौरा हे उशिरा सुचलेलं शहाणपण; पुणे दौऱ्यावरुन भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here