मुंबई : कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागल्यानंतर राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं बंद होती. मात्र आता महाराष्ट्रातील शाळा पुन्हा उघडण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरू होणार आहेत. तर इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही., अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.
लॉकडाऊन कालावधीत राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र आता नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची तयारी राज्य शासन करत आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होतो; ‘या’ भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य
आमच्या मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणाऱ्या लोकांची तोंडे काळी झाली- रूपाली पाटील ठोंबरे
“दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर 18 धावांनी विजय”