आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका इंग्रजी प्रश्नाचा व्हिडीओ शिवसेनेकडून व्हायरल करुन नारायण राणेंची खिल्ली उडवली जात आहे. नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेत व्हायरल झालेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.
मला खासदार कनिमोझी यांचा प्रश्न समाजाला होता, पण अधक्ष्याना वाटलं तो प्रश्न समजला नसेल म्हणून अध्यक्षनी तो पुन्हा सांगितला, असं सांगतानाच जे काही करायचे आहे ते करा.. मी पूर्ण तयारीने गेलो होतो. कोणतेही कागदपत्रे हातात न घेता उद्योगासंदर्भात माहिती दिली, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : जितेंद्र आव्हाड म्हणतात, राष्ट्रवादीसाठी सर्व मार्ग खुले; विनायक राऊत म्हणाले…
भारत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचे काम सुरू आहे. अधिवेशनमध्ये कायदे करणारी बिल पास होत आहेत. सर्व काही व्यवस्थित सुरु आहे, असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांनी इंग्रजी भाषेतून, देशातील बंद पडलेल्या आणि डबघाईला आलेल्या उद्योगांसाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजना उद्योजकांपर्यंत कशा पोहोचवणार, असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला मंत्री नारायण राणेंना उत्तर व्यवस्थित देता आलं नाही, असं म्हणत शिवसैनिकांनी राणेंचा हा व्हिडीओ व्हायरल करत राणेंची खिल्ली उडवली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“पुण्यातील भाजपच्या दोन नेत्यांनी वक्फच्या जमिनी हडपल्या, लवकरच त्यांना अटक होणार”
सांगलीत शिवसैनिकांनी रूग्णांना मिळवून दिला न्याय, हाॅस्पिटलने फसवणूक केलेली रक्कम दिली परत
सुप्रिया सुळे यांच्या नातेवाईकांवर छापेमारी झाली ती योग्यच होती- नारायण राणे