मुंबई : शनिवारी अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे आमदार राजभवनावर जाण्याआधी धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर आले होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यावर आता धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मी पवार साहेबांसोबतच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आहे.. कुणीही कोणताही संभ्रम पसरवू नये, असं ट्वीट करुन धनंजय मुंडे यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.
मी पक्षासोबत, मी आदरणीय पवार साहेबांसोबत. कृपया कोणीही कोणताही संभ्रम निर्माण करू नये ही विनंती.@PawarSpeaks @NCPspeaks
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 24, 2019
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे हे देखील गायब होते. त्यांचा फोन नॉट रिचिबल लागत होता. मात्र राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक वाय. बी. चव्हाण सेंटरला सुरू झाल्यानंतर ते काही वेळात बैठकीसाठी आले होते.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घण्याआधी धनंजय मुंडे यांच्याशी दीर्घ चर्चा केली. आणि नंतर शरद पवार यांनीही धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केल्याचं कळालं आहे.