आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाआघाडीचे सहकार विकास पॅनेल निवडून आले. आता बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. काँग्रेसकडून कोण उपाध्यक्ष होणार याबाबतचा निर्णय सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम घेणार असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा : मुंबईत भाजप-शिवसेना नगरसेवकांमध्ये जोरदार राडा
राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्याने अध्यक्षपदासाठी आमदार नाईक यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीने अध्यक्षपदावर दावा केला असला तरी काँग्रेसनेही शेवटची दोन वर्षे अध्यक्षपद मागितले आहे. मात्र त्यासंदर्भात अद्यापही कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. तरीही अध्यक्षपद आधी काँग्रेसला घ्यायचे की नंतर घ्यायचे तसेच उपाध्यक्षपद आधी घेतले तर संधी कोणाला द्यायची याबाबतचे सर्वाधिकार विश्वजित कदम यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
दरम्यान, या पॅनेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेने 21 पैकी 17 जागांवर बाजी मारली. विरोधी भाजपप्रणीत शेतकरी विकास पॅनेलने चार जागा जिंकल्या. तर राष्ट्रवादीला 9, काँग्रेसचे 4 तर शिवसेनेला 3 जागा राखता आल्या.
महत्वाच्या घडामोडी –
मनसे कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा; राज ठाकरे घेणार अंतिम निर्णय
“पुण्यात केवळ शनिवारवाडाच नाही तर…”; अमोल कोल्हेंचं ट्विट चर्चेत
शिवसेनेने घेतलेल्या ‘या’ भूमिकेला काँग्रेसचं समर्थन