आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला प्रकरणी आज भाजपाचे आमदार नितेश राणे यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नितेश राणे बुधवारी कणकवली कोर्टात शरण आले, त्यानंतर शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी नितेश राणेंवर निशाणा साधलाय.
संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गल्ली पासून दिल्ली पर्यंत सर्व प्रयत्न करून झाले आणि या पूर्वीच त्यांनी कायद्याचं पालन केलं असतं, कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं असतं तर त्यांची प्रतिमा थोडी तरी टिकून राहिली असती. मात्र आज त्यांची सर्व प्रतिमा लयास गेली आहे, असं मनीषा कायंदे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “उद्धव ठाकरे-अजित पवार ही ढवळ्या पवळ्याची जोडी”
दरम्यान, कायद्यापुढे कोणाच काही चालत नाही आणि कायदा सर्वांसाठी समान असतो निदान हा बोध राणे यांनी आत्ता तरी घ्यायला पाहिजे, असंही मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे.
गल्ली ते दिल्ली पळाला, अखेर ‘बोक्या’ शरण आला. आता दोन दिवस बस पोलीस कोठडीत. न्यायापुढे सगळे समान असतात!#NiteshRane @ShivSena @ShivsenaComms #Mumbai #Maharashtra @AUThackeray @the_yuvasena @yuvatiyuvasena pic.twitter.com/cVtVOIVijL
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) February 2, 2022
महत्वाच्या घडामोडी –
“ राणे महासंत आहेत, त्यांची…”; नितेश राणेंना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर गुलाबराव पाटलांचा टोला
सर्वात जास्त पिणारी मंडळी भाजपमध्येच आहेत; नवाब मलिकांचं जोरदार प्रत्युत्तर
बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ‘त्या’ आमदारांना रस्त्यात तुडवा, संजय राऊतांनी सांगितली जुनी आठवण