Home पुणे अखेर अमोल कोल्हेंनी सांगितलं एकांतवासाचं गुपित; म्हणाले…

अखेर अमोल कोल्हेंनी सांगितलं एकांतवासाचं गुपित; म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : खासदार अमोल कोल्हे यांनी 7 नोव्हेंबर रोजी एक पोस्ट लिहून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आपण एकांतवासात जात असल्याचे त्यांनी सांगितले होते. यावरून अनेक चर्चा रंगल्या. थेट राजकीय संन्यास ते त्यांचं पक्षांतर. मात्र, या साऱ्या तर्कांना पूर्णविराम देत, अखेर अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आपण माझी काळजी केली. अनेक जणांनी माझ्या एकातंवासाच्या पोस्टवर मत व्यक्त केले. मला मात्र, यातून एक जाणीव झाली. ती म्हणजे आपल्या मानसिक आरोग्याच्या जाणिवेची गरज. तुमच्या-माझ्यासारख्या माणसाला येणारा आणि दुर्लक्षिला जाणारा मानसिक थकवा. ही मला सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटली. आपण अनेक दुर्दैवी बातम्या ऐकतो. वयाच्या तिशीच ह्रदविकारानं मृत्यू, पस्तीशित मधुमेह. अस्थमा, डोकेदुखी वगैरे…वगैरे. या साऱ्या आजाराचे मूळ आपल्या मानसिकतेत आहे. आपल्याला पुरुषानं रडायचं नाही, त्यानं हळवं व्हायचं नाही हेच माहितंय. आपलं हळवेपण, भावना सार्वजनिक करायच्याच नाहीत. शिव्या देणं, कणखर असणे म्हणजेच पुरुष, असे शिकवले गेले. स्वप्न, आकांक्षा, गरजेच्या सीमारेषा पुसट झाल्या. आपण कशासाठी धावतोय, हेच विसरलो. एकवेळ आपण धावताना थकतो. त्यावेळी शरीर थांबतं, पण मनाचं काय, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : राज्यातील 95 टक्के मुसलमान प्रामाणिक, 5 टक्के मुस्लिम गडबड करतात- चंद्रकांत पाटील

ग्रामीण भागातून शहरात येणारा प्रत्येक जण विभक्त कुटुंबात स्थिरावतो. त्याला मन कुठेतरी मोकळे करायचे हेच समजतं नाही. त्याच्या आत खूप काही साचत जातं. यातूनच मधुमेह, ह्रदयविकार इतर आजार जडतात. त्यामुळं व्यक्त व्हा, मोकळे व्हा. हे होताना स्वतःला कमकुवत समजू नका. कणखरपणा वगैरे वगैरे ही सारी बेगडी विशेषणं आहेत, आपल्या भावनांचा निचरा होऊ द्या. खूप धावल्यानंतर थोडं थांबा. घडीभर विश्रांती घ्या. मी थांबलो तेव्हा अनेकांनी हा मावळतीचा सूर्य असल्याचं म्हटलं. आपण इतके निगेटिव्ह का झालोयत. आपली संस्कृती पाहा. हा मावळतीचा सूर्य नसून उगवतीचा सूर्य आहे. तुम्ही याचं अनुकरण केलं, की मानसिक ताण, मधुमेह आणि ह्रदयविकारापासून दूर व्हालच, असंही अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, मी अनेक विषयांवर चिंतन केलंय. त्यावर कालांतरानं व्यक्त होईन. मात्र, म्हणतात ना लोक सेलिब्रेटी आणि राजकारण्यांचं अनुकरण करतात. त्यामुळं मी सारं तुमच्यासाठी सांगतोय. तुम्ही हे अनुकरण केलेलं मला आवडेल. आपला मानसिक थकवा स्वीकारा. उरफुटेस्तोर धावण्याऐवजी थोडं थांबा. स्वतःत डोकावून पुन्हा उगवतीचा सूर्य घेऊन पुढे चाला, असंही अमोल कोल्हेंनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

एसटी कर्मचाऱ्यांना कोणीतरी भडकवतंय; अजित पवारांचा गंभीर आरोप

पायातली ‘कोल्हापूरी चप्पल’ हातातही घ्यायला शिका; राजू शेट्टींचा शेतकऱ्यांना सल्ला

भाजपकडून दंगलीचं राजकारण सुरू, जनतेनं भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नये- नाना पटोले