आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने ठाकरे सरकारमधील नेत्यांवर आरोप करताना दिसत आहेत. अशातच सोमय्यांनी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर अनिल परब यांनी ईडीच्या कोठडीत जाण्यासाठी बॅग भरून तयार रहावं, असं म्हटलं होतं. यावरून आता अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बॅग भरून तुरुंगात जायला ही काय सहल नाही, असा टोला अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना यावेळी लगावला. ते लोकसत्ता डाॅट काॅमच्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
बॅग भरून जेलमध्ये जायला ही काही ट्रीप नसते. कुणीही बॅग भरून जेलमध्ये ट्रीपला जात नाही. मी गुन्हेगार असेन, माझ्यावरील गुन्हे सिद्ध झाले तर मला जी शिक्षा देण्यात येईल ती मला मान्य करावीच लागेल. मात्र, मी गुन्हेगार नसेन आणि तरीही कुणी आरोप करत असेल तर त्याची उत्तरं त्यांनाही द्यावी लागतील, असं जोरदार प्रत्युत्तर अनिल परब यांनी सोमय्यांना यावेळी दिलं.
हे ही वाचा : “आगामी निवडणूकीपूर्वी मनसेचा शिवसेनेला मोठा धक्का, अनेक शिवसैनिकांनी केला मनसेत प्रवेश”
किरीट सोमय्यांकडून बदनामी करण्याचं काम होतंय. खोटी कागदपत्रे दाखवली जात आहेत, त्यावरून भ्रम तयार केला जात आहे आणि सगळे भ्रष्ट आहेत असं दाखवलं जातंय, असं परब म्हणाले.
दरम्यान, ज्याच्यावर विक्रांतचे पैसे खाल्ल्याचा आरोप आहेत त्या व्यक्तीने दुसऱ्यांवर अशा प्रकारचे आरोप करणं हास्यास्पद आहे. याच्या दोन्ही बाजूंनी चौकशा सुरू आहेत. आमचं म्हणणं आहे की, चौकशा होऊ द्या. चौकशी अंती खरं बाहेर येईल, असंही परब यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
ही सगळी…; मनसेने शिवसेनेला पुन्हा डिवचलं
मी रात्री 12 वाजता अमित शहांना फोन केला आणि सांगितलं…; संजय राऊतांचा खुलासा