“जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करा”

0
156

अहमदनगर : निळवंडे कालव्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेनेचे शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली.

निळवंडे डाव्या कालव्यावरील आढळा जलसेतूचा आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाहणी दौरा केला. दौऱ्यावेळी सर्व अधिकारी आणि कार्यकर्ते मिळून 100 पेक्षा अधिक लोक जमले. त्यामुळे या प्रकरणी कार्यकारी अभियंते गिरीश संघाणी व अधीक्षक अभियंते अरुण नाईक यांची चौकशी करून पदाधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी लोखंडे यांनी केली आहे. तसेच या पाहणी दौऱ्यावेळी सोशल डिस्टंसिंगची कोणतीही काळजी घेण्यात आली नाही, असा आरोपही लोखंडे यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

अजितदादांनी उद्धव ठाकरेंना सल्ला द्यावा, नाहीतर…; चंद्रकांत पाटलांचा टोला

महाविकास आघाडीच्या नावाने राज्याला ब्लॅक फंगस मिळाला; प्रसाद लाड यांचा पलटवार

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागलंय- नवाब मलिक

“बोरूबहाद्दर म्हणतायत विरोधक ब्लॅक फंगस, म्हणून मुख्यमंत्री कायम कडी लावून घरी बसलेले असतात का?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here