“पोलिसांना धमकावल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करा”

0
181

मुंबई : मुंबई पोलिसांना धमकावल्याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर भादंवि कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना धमकी देण्याचा प्रयत्न केला होता. मी स्वत: जाऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटून मी त्यांना ही मागणी केली होती. फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. तसेच सरकार तात्काळ ही कारवाई करेल अशी आशा आहे, असं भाई जगताप म्हणाले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यासाठी मी सरकारला पत्रं दिलं आहे. त्याला 8 दिवस उलटले तरी अद्यापही निर्णय घेण्यात आला नाही, असंही जगताप यावेळी म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

चार महिन्यात ठाकरे सरकारचे सहा मंत्री सीबीआयच्या दारात असतील- किरीट सोमय्या

आरोग्यमंत्री गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का?; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

“पंकजाताई होणाऱ्या त्रासाची मला जाणीव, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे”; धनंजय मुंडेची फेसबुक पोस्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here