Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, भाजप आमदार अतुल भातखळकरांची थेट पोलिसात तक्रार

मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, भाजप आमदार अतुल भातखळकरांची थेट पोलिसात तक्रार

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

आता राज्यात बाहेरून कोण येतो, कोठून येतो, याची नोंद ठेवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या गृह विभागाच्या आढावा बैठकीत दिले. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. या वक्तव्याने एक समाज भयभीत झालेला आहे. जर परप्रांतीय गुन्हेगार असतील तर शिवसेना नेते संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे कुठल्या प्रांतातून आले आहेत? मुख्यमंत्र्यांविरोधात कलम 154अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असं भातखळकर म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

शेतकरी बांधवांनो खचून जाऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे- धनंजय मुंडे

“गुजरात जर विकासाच्या मार्गावर होतं, तर रातोरात मुख्यमंत्री का बदलला?, हेच का गुजरात माॅडेल?”

बलात्काऱ्याला आमच्या ताब्यात द्या, इथं न्याय होणारच! मनसे नेत्या रूपाली पाटील संतापल्या

राज्य सरकारनं ओबीसी समाजाची दिशाभूल केली; बावनकुळेंचा घणाघात