Home महाराष्ट्र “जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा…”

“जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा…”

पंढरपूर : जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

जयंत पाटील यांनी उजनी धरणातून इंदापूर तालुक्याचा पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला. मात्र अद्याप याचा अध्यादेश काढण्यात आलेला नाही  त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे याविरोधात जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा,  असं प्रभाकर देशमुख म्हणाले आहेत.

दरम्यान, उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाच टीएमसी पाणी मंजूर केलेला अध्यादेश रद्द करा, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेकडून उजनी धरण परिसरातील भिमानगर येथे 16 दिवसांपासून आंदोलन करत आहोत. त्या आंदोलनाची दखल घेऊन राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी 19 मे रोजी पाच टीएमसी पाण्याचा अध्यादेश रद्द केला होता. याबाबतची माहिती सोशल मीडियातून देण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

सरकार टिकवणं ही एकट्या शिवसेनेची जबाबदारी नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भाजपानं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत- चंद्रकांत पाटील

“शिवसेना नाराज ही केवळ अफवा, शरद पवारांचा या सरकारला पूर्ण आशीर्वाद असून सरकार 5 वर्ष चालणार”

मी भाजपा ची पोलखोल करणार; सचिन सावंतांचा इशारा