Home देश निवडणुकीआधी काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल

निवडणुकीआधी काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बंगरुळू : कर्नाटकमधील बंगळुरू स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे उमेदवार युसूफ शरीफ यांच्याविरुद्ध दोन तर काँग्रेस आमदार नारायण स्वामी यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल केला आहे.

युसूफ शरीफ यांच्याविरुद्ध मतदारांना प्रलोभन देण्याचा तर स्वामी यांच्याविरुद्ध मतदारांना धमकावल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा : शिवसेनेचे नगरसेवक कॉंग्रेसचा झेंडा घेऊन निवडणूक रिंगणात; चर्चांना उधाण

शरीफ हे त्यांच्या अवाढव्य संपत्तीमुळे चर्चेत आहेत. ते भंगार व्यावसायिक होते. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी 1 हजार 744 कोटींची मालमत्ता जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पक्षीय वर्तुळात त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला होता.

शरीफ यांच्याकडे स्थावर मालमत्ता 1 हजार 643 कोटी रुपये, जंगम मालमत्ता 97.98 कोटी आणि कर्ज 67.24 कोटी रुपये आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीकडे स्थावर मालमत्ता 1.30 कोटी रुपये आणि जंगम मालमत्ता 98.96 लाख रुपये आहे. दुसऱ्या पत्नीकडे जंगम मालमत्ता 32.22 लाख रुपये आहे. इतर मालमत्ता त्यांच्या मुलांच्या नावावर आहे.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊत यांच्याविरोधात भाजपा नगरसेविकांनी केली तक्रार दाखल

माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला, महिलांचा अपमान करणं हा माझा स्वभाव नाही- आशिष शेलार

आशिष शेलारांवर गुन्हा दाखल; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर गंभीर आरोप, म्हणाले…