मुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 या उपक्रमांतर्गत वर्षभरात विविध कंपन्यांशी सामंजस्य करारांद्वारे 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकारने आणल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग विभागाच्या वतीने 25 भारतीय कंपन्यांशी उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत 61 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. तसेच यातून 2.5 लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितलं. यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
2,50,000 नवे रोजगार, 61 हजार कोटींची गुंतवणूक? हे रतन खत्रीचे आकडे सांगून काय उपयोग? आधी हे सांगा… आत्महत्या करणाऱ्या शिक्षकांना पगार कधी देणार? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी करणार? वीज बिलांचा झटका दिलात त्यांना दिलासा कधी देणार? बारा बलुतेदारांच्या मदतीचे काय झाले?, असं म्हणत शेलारांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
2,50,000 नवे रोजगार, 61 हजार कोटींची गुंतवणूक?
हे रतन खत्रीचे आकडे सांगून काय उपयोग?
आधी हे सांगा…
आत्महत्या करणाऱ्या शिक्षकांना पगार कधी देणार?
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी करणार?
वीज बिलांचा झटका दिलात त्यांना दिलासा कधी देणार?
बारा बलुतेदारांच्या मदतीचे काय झाले?
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 23, 2020
निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना मदत कधी मिळणार? उध्दवस्त पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी पोहचणार? आरोग्य सेविका, कोविड योध्दे यांना मानधन कधी मिळणार? शाळांची फि कपात करुन पालकांना दिलासा कोण देणार? सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे? कशी आणणार गुंतवणूक? ज्यांचे विकासाशी सदैव वाकडे!, असं ट्विट करत शेलारांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना मदत कधी मिळणार?
उध्दवस्त पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी पोहचणार?
आरोग्य सेविका, कोविड योध्दे यांना मानधन कधी मिळणार?
शाळांची फि कपात करुन पालकांना दिलासा कोण देणार?सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे?
कशी आणणार गुंतवणूक?
ज्यांचे विकासाशी सदैव वाकडे!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 23, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“आम्ही कोणालाही झटके देत नाही, अनेकजण शिवसेनेत यायला तयार आहेत”
“मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता”
भाजपला टीकेबद्दल ‘भारतरत्न’ द्यायला हवा; संजय राऊतांचा टोला
“अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला कोरोनाची लागण”