मुंबई : दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात बळी पडलेली निर्भया आणि तिच्या कुटुंबियांना अखेर न्याय मिळाला आहे. चारही दोषींना आज पहाटे 5.30 वाजता फासावर लटकवण्यात आलं. यावर अभिनेता रितेश देशमुख याने ट्विटवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या.
बलात्कारासारखा भयंकर गुन्हा करणाऱ्याचा विचारही कोणाच्या मनात येऊन नये अशी भिती निर्माण करायची असल्यास कायदे कठोर करणं गरजेचं आहे. कठोर शिक्षा, जलद गतीने होणारा न्यायनिवाडा हेच असे गुन्हे थांबवण्याचा मार्ग आहे, असं रितेश म्हणाला
माझे विचार आणि प्रार्थना निर्भयाच्या पालक, मित्र आणि प्रियजनांबरोबर आहेत. प्रतीक्षा दीर्घ आहे परंतु न्यायाची सेवा दिली गेली आहे, असं ट्विट रितेश देशमुखने केलं आहे.
#JusticeForNirbhaya My thoughts and prayers are with the parents, friends & loved ones of Nirbhaya. The wait has been long but the justice has been served.
— Riteish Deshmukh (@Riteishd) March 20, 2020
महत्वाच्या घडामोडी-
अखेर न्याय मिळाला; चारही दोषींना फासावर लटकवण्यात आलं
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर आज गावोगावी तिरड्या उठल्या असत्या; राष्ट्रवादीचा फडणवीसांना टोला
राज्य सरकार करोनाशी सामना करतंय, तर देवेंद्र फडणवीसंचे समर्थकांनी राजकारण
संसर्ग कमी करण्यासाठी राज ठाकरेंनी सुचवले ‘हे’ उपाय