Home महाराष्ट्र बाप-बेटे घरी बसून आहेत, पार्ट्यांना जातात पण कॅबिनेटला नाही; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना...

बाप-बेटे घरी बसून आहेत, पार्ट्यांना जातात पण कॅबिनेटला नाही; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

सिंधुदुर्ग : भाजप खासदार नारायण राणे यांच्या लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये कोव्हिड चाचणी प्रयोगशाळेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

देवेंद्रजी तुमच्या मनातलं लवकर साध्य होवो. मंत्रालय ओसाड आहे, घरी राहून काम सुरु आहे. बाप-बेटे घरी बसून आहेत. पार्ट्यांना जातात पण कॅबिनेटला नाही, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस वयाने लहान असले तरी त्यांचं आणि माझं मैत्रीचं नातं आहे. मी सांगितलेलं कुठलंही काम त्यांनी केलं नाही असं होत नाही. ते नेहमीच सहकार्य करतात, असं नारायण राणे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, ही लॅब उभी राहावी म्हणून भाजपच्या पाच आमदारांनी प्रत्येकी 20 लाख रुपये दिले. पाचही जणांचे मी ऋण व्यक्त करतो. दीड तासात 96 टेस्ट ही नाविन्यपूर्ण गोष्ट आहे आणि ती कोकणात होत आहे, असंदेखील नारायण राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

संजय दत्तचा कोविड -19 अहवाल निगेटिव्ह; मानले डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांचे आभार

“युजवेंद्र चहल लवकरच अडकणार लग्नबंधनात, घरच्या घरी साखरपुडा सोहळा संपन्न”

संजय राऊतांच्या टीकेला भाजप नेते आशिष शेलारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी…; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा