मुंबई : राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत. अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा काल रात्री मुंबईत दाखल झाला आहे आहे. या मोर्चामध्ये समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी देखील उपस्थित होते. यानंतर अबु आझमींनी माध्यमांशी संवाद साधला.
गायीची जशी पूजा केली जाते, तशी शेतकऱ्याची पूजा करायला हवी. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायलाच हवेत, असं अबु आझमी म्हणाले. तसेच शेतकरी गेल्या 2 महिन्यांपासून ज्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या जाचाला सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, असंही अबु आझमी म्हणाले.
दरम्यान, केंद्र सरकार शेतकऱ्यांना संपवण्याचं काम करत आहे, असं म्हणत अबु आझमी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
केंद्र सरकार हट्टीपणे वागले नसते तर ही वेळ आलीच नसती- जयंत पाटील
“असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही”
सुशांत सिंग राजपूतप्रमाणे ‘या’ स्टार अभिनेत्रीने केली आत्महत्या
“कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का?”; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापले