Home नागपूर शेतकऱ्याचं कर्जमाफ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेची मोठी घोषणा

शेतकऱ्याचं कर्जमाफ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेची मोठी घोषणा

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी योजनेबाबतची घोषणा केली आहे.

2 लाखांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणार असल्याची घोषणा विधासभेत करण्यात आली. 2 लाखापर्यंत संपूर्ण कर्जमाफी असेल. शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळवण्यासाठी खेटे घालावे लागणार नाहीत. त्यांना अधिकाधिक, लवकर आणि योजनेचा सर्व फायदा मिळेल याची काळजी सरकार घेईल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी खेटे घालावे लागणार नाहीत. त्यांना अधिकाधिक, लवकर आणि योजनेचा सर्व फायदा मिळेल याची काळजी सरकार घेईल. तर 30 सप्टेंबर 2019 पासून शेतकऱ्यांची कर्जमाफी लागू होणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीला महात्मा फुले कर्जमाफी योजना असं नाव देण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-निलेश राणे यांनी केली संजय राऊतांवर आक्षेपार्ह पोस्ट

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या राजकारणासाठी बाळासाहेबांच्या हिंदूत्वाला काळिमा फासला- आशिष शेलार

-गेल्या दिड- दोन महिन्यात महाराष्ट्राने बिन पैशाचा तमाशा बघितला- राज ठाकरे

-राहुल द्रविडच्या मुलाने ठोकले द्विशतक