नांदेड : माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नांदेडमध्ये पीक नुकसानीची पाहणी केली. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा दसरा तर अश्रूत गेला, आता राज्य सरकारने तातडीने मदत देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.
मुख्यमंत्री माझे भाऊ आहेत. पण भाऊ म्हणून नव्हे तर मुख्यमंत्री म्हणून मी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी त्यांच्याकडे करणार आहे. आम्ही बहीण भाऊ आहोत, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आमच्या नात्यामध्ये पक्ष आणि बाकी राजकारण येऊच शकत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, केंद्राकडून मदत मिळावी, यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही; पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन
दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ; प्रविण दरेकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
अभिनेत्री कंगणा रणाैतला बलात्काराची धमकी