बीड : गेल्या काही दिवसांमागे परळी जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अतिवृष्टी पाहणी दौरा केला. यावेळी धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
शेतकरी बांधवांनी या कठीण प्रसंगात खचून जाऊ नये. पुन्हा उभारी घेण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे सुरू आहेत. नुकसान झालेला एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी काळजीपूर्वक पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत, असं धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“कर्णधार म्हणून विराट कोहलीच; कर्णधारपदाच्या संभाव्य चर्चेवर बीसीसीआयचं स्पष्टीकरण”
“राज ठाकरेंची ‘ती’ सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंमलात आणणार; पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश”
“गुजरात जर विकासाच्या मार्गावर होतं, तर रातोरात मुख्यमंत्री का बदलला?, हेच का गुजरात माॅडेल?”
बलात्काऱ्याला आमच्या ताब्यात द्या, इथं न्याय होणारच! मनसे नेत्या रूपाली पाटील संतापल्या