Home देश “हरियाणात भाजप विरोधात शेतकरी आंदोलन, पोलिसांच्या लाठीचार्जमुळं शेतकरी रक्तबंबाळ”

“हरियाणात भाजप विरोधात शेतकरी आंदोलन, पोलिसांच्या लाठीचार्जमुळं शेतकरी रक्तबंबाळ”

नवी दिल्ली : हरियाणामधील स्थानिक आणि पंचायतीच्या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपच्या वतीनं करनालमध्ये राज्य पातळीवरील बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीस शेतकऱ्यांनी विरोध करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आक्रमक शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग 44 वर बसतांडा टोल नाक्यावर नाकाबंदी केली होती. दुपारी पोलीस शेतकऱ्यांची समजूत काढायला गेले तेव्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. यावेळी शेतकऱ्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. तसेच पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाल्याचं दिसून आलं.

दरम्यान, यावरून कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचे नेते आणि भारतीय किसान यूनियनचे राकेश टिकैत यांनी लाठीमारावर नाराजी व्यक्त केली आहे. हरियाणातील बसताडा टोलनाक्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार ही दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं आहे. तर, 5 सप्टेंबरला मुजफ्फरनगरमध्ये होणाऱ्या महापंचायतीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप राकेश टीकैत यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

जिथं दिसेल तिथं संजय राऊतांचा करेक्ट कार्यक्रम करू; निलेश राणेंचा इशारा

भाजप आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही, म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर- ममता बॅनर्जी

10 दिवसात मंदीरे खुली करा अन्यथा…; अण्णा हजारेंचा सरकारला इशारा

अजून एखादा करेक्ट कार्यक्रम करू; संजय राऊतांचा नारायण राणेंना अप्रत्यक्ष इशारा