आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : चित्रपटातील दिग्दर्शक आणि कलाकार फरहान जावेद अख्तरवर अभिनेत्री तृप्ती जितेंद्र बर्डे यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसेचं फरहान अख्तरकडून होणारी बदनामी आणि चारित्रहनन थांबवण्यासाठी कडक निर्णय घ्यावेत किंवा मला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी अभिनेत्री बर्डे हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
तृप्ती बर्डे म्हणाली की, गेल्या महिनाभरापासून प्रसिद्ध व्यक्ती फरहान जावेद अख्तर हे माझ्या जिवनावर आधारित सुपर बॉईज ऑफ मालेगाव या चित्रपटात माझे चुकीचे व्यक्तीरेखा चित्रण करत आहेत. या चित्रपटात त्यांनी माझ्याबद्दल लव्ह जिहादसारखे खोटे आरोप करुन माझी बदनामी आणि चारित्र्यहनन केले आहे. यामुळे माझ्या सामाजिक जिवनावर आणि प्रतिष्ठेवर गंभीर परिणाम झाला आहे. मी मानसिकदृष्ट्या पुर्णपणे खचली आहे. यामुळे मला जिवन जगणे अवघड झाले आहे, असं तृप्ती म्हणाली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून फरहान जावेद अख्तरला हे बदनामीकारक कृत्य थांबवण्यास सांगावे, जर हे शक्य नसेल तर मला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशीही मागणी तृप्ती बर्डे हिने केली.
महत्त्वाच्या बातम्या –
श्यामची आई चित्रपटातील ‘श्याम’ हरपला ; अभिनेते माधव वझे यांचं निधन
रणजित बोत्रे यांची सीना स्टार जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारतानं घेतले पाच सर्वात मोठे निर्णय
‘दहशतवाद्यांशी एकटा भिडला, बंदूक हिसकावली अन्…’, कोण आहे? हल्ल्यात मारला गेलेला सय्यद हुसैन शाह