“प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी, गाैतमी पाटील हिनं घेतली, छत्रपती उदयनराजे भोसलेंची भेट, चर्चांना उधाण”

0
199

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील हिनं आज साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी गौतमीने उदयनराजे यांना खास भेटवस्तू दिली.

गौतमी पाटील हिने आज खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या साताऱ्यातील जलमंदिर या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. यावेळी गाैतमीनं माध्यमांशी संवाद साधला.

ही बातमी पण वाचा : “राष्ट्रवादीला मोठा धक्का, सुप्रिया सुळेंचा, अत्यंत निकटवर्तीय, ‘हा’ आमदार उद्या भाजपचं कमळ हाती घेणार”

महाराजांना पहिल्यांदाच मी भेटले. त्यांचा आशीर्वाद कायम सोबत राहावा यासाठी मी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी आलं असल्याचं गाैतमीनं यावेळी सांगितलं. तसेच या भेटीत तिनं खासदार उदयनराजे भोसले यांना त्यांचा आवडता परफ्युम भेट दिला.

दरम्यान, माझे जरी चाहते असले तरी छत्रपती उदयनराजे भोसले हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे मी त्यांच्यापेक्षा मोठी नाही. त्यांची बरोबरी माझ्याबरोबर नको, अशी प्रतिक्रिया गाैतमीनं यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.

महत्त्वाच्या घडामोडी –

मुनगंटीवार म्हणाले, पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी, आता राज ठाकरेंचा थेट हल्लाबोल, म्हणाले…

“काँग्रेसच्या विजयानंतर आम्हाला ऊर्जा मिळाली”

कर्नाटक निवडणूकीवरून राज ठाकरेंचा, भाजपला टोला, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here