पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते 47 वर्षांचे होते.
पुण्यातील डॉन स्टुडिओमध्ये सकाळी 9.30 वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. तर 11.00 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, नरेंद्र भिडे यांनी बायोस्कोप, रानभूल, पेईंग घोस्ट, देऊळ बंद या चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन केलं होतं. तसेच हम्पी, उबंटू, पुष्पक विमान, 66 सदाशिव या सिनेमांतील गाण्यांनाही त्यांनी संगीत दिलं आहे. तसेच मुळशी पॅटर्न या चित्रपटात त्यांनी कलाकार म्हणून भूमिकाही बजावली होती.
महत्वाच्या घडामोडी-
शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात; रावसाहेब दानवेंचं धक्कादायक वक्तव्य
“सुपारीबाज आंदोलकांना मोदी भीक घालणार नाहीत”
मतदारांनी भाजपला जागा दाखवली; कुठलीही पालिका निवडणूक लढवा, पराभव निश्चित- सचिन सावंत
“देशातील सर्व पेट्रोल पंपांची नाव बदलून नरेंद्र मोदी वसुली केंद्र करा”