“प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी यांच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन”

0
291

मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान राज कौशल यांची प्राणज्योत मालवली.

1999 मध्ये अभिनेत्री मंदिरा बेदी आणि राज कौशल यांचा विवाह झाला होता. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. 2011 मध्ये त्यांचा मुलगा वीर कौशल याचा जन्म झाला. तर गेल्याच वर्षी त्यांनी 4 वर्षांच्या मुलीला दत्तक घेतलं होतं. तसेच राज काैशल यांनी 3 चित्रपटांचं दिगदर्शन केलं आहे. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन राज कौशल यांनी केलं आहे.

दरम्यान, राज कौशल यांच्या निधनाने बॉलिवूडमधील दिग्गजांनीही शोक व्यक्त केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“दहावी, बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता; असा पाहू शकता निकाल”

“फडणवीसांनी संन्यास घेतला तर मराठी माणसाचा जाच संपेल”

शिवसेनेचा मोठा निर्णय, सर्व आमदारांना ‘व्हिप’ जारी

“आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here