मुंबई : अजेंड्यावर काम करताना सरकार पडणं आमचं बायप्रॉडक्ट आहे, मेन प्रॉडक्ट नाही असं राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसत्ता’कडून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
“सत्ता पक्षात असो किंवा विरोधी पक्षात आमचा अजेंडा ठरलेला आहे. आमच्या अजेंड्यावर आम्ही करत आहोत. आमच्या अजेंड्यावर काम करताना सरकार पडणं आमचं बायप्रॉडक्ट आहे, मेन प्रॉडक्ट नाही,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
“आम्ही राजकारणात भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही. केवळं भजनं म्हणण्यासाठी आम्ही येथे आलेलो नाही. आमचा एक विकासाचा अजेंडा आहे. तो अजेंडा राबवायचा असेल तर सरकारमध्ये यावं लागेलं. आम्हाला काय खुर्च्या उबवण्यासाठी सरकारमध्ये यायचं नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
बीडमधील मराठा मोर्चाला प्रशासनाची गरज नाही, मोर्चा निघणारच- विनायक मेटे
अनलॉकच्या गोंधळावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे- देवेंद्र फडणवीस
छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं- संभाजीराजे छत्रपती