फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही- एकनाथ खडसेंचा टोला

0
511

मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

विधानपरिषदेवरील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचा पराभव हा फाजिल नेतृत्वामुळे झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ही भावना अजून गेली नाही, असं म्हणत खडसेंनी भाजपला टोला लगावला आहे.

दरम्यान, अहम्-पणाचा पराभव झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही. पुणे आणि नागपूरसारखा परंपरागत मतदारसंघ भाजपच्या हातून गेला. लोकांचा आता भाजपवरील विश्वास कमी होत चालला आहे आणि महाविकास आघाडीवर विश्वास वाढला आहे., असं म्हणत खडसेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती- सुप्रिया सुळे

‘ते’ मुख्यमंत्र्याचे काैतुक आहे की अब्रू काढणे हे फक्त अजित पवारच सांगू शकतात- अतुल भातखळकर

भाजपने आता तरी जनतेला गृहीत धरणे सोडावे- विजय वडेट्टीवार

चंद्रकांतदादांनी माझा विजय सोपा केला- अरुण लाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here